पुढारी ऑनलाइन डेस्क : FIR on Digvijay Singh : आरएसएसचे माजी सरसंघचालक माधवराव गोळवळकर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्या बद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. इंदूरच्या तुकोगंज पोलिस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय सिंह यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 153A, 469, 500 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिग्विजय सिंह यांनी शनिवारी एक पोस्टर ट्विट केले. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले की, "दलित, मागासलेल्या आणि मुस्लिमांसाठी आणि राष्ट्रीय जल, जंगल आणि जमिनीवर गुरू गोळवलकर जी यांचे विचार काय होते ते जाणून घ्या."
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोळवलकर यांनी दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिमांना समान अधिकार देण्यापेक्षा ब्रिटीश राजवटीत राहणे पसंत केले आहे.
दिग्विजय सिंह यांच्या या ट्विटला आरएसएसचे वरिष्ठ अधिकारी सुनिल आंबेकर यांनी उत्तर दिले. आंबेकर म्हणाले की,गोळवलकर यांच्या संदर्भात केलेले हे ट्विट तथ्यहीन आहे आणि सामाजिक वितुष्ट निर्माण करणारे आहे. हे खोटे फोटोशॉप केलेले चित्र टाकण्यात आले आहे. संघाची प्रतिमा डागाळण्याचा उद्देश आहे. गोळवलकर यांनी असे कधीच सांगितले नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक भेदभाव संपवण्यात गुंतले होते."
मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील वकिल राजेश जोशी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. सिंह यांनी सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी 'जाणूनबुजून' गोळवलकर यांच्या विरोधात टिप्पणी केली आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "त्यांच्या वक्तव्यामुळे आरएसएस कार्यकर्ते आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
हे ही वाचा :