MP Urination Incident : ‘त्याला चूक कळली; आरोपीची सुटका करा’ – लघुशंका प्रकरणातील पीडिताची मागणी | पुढारी

MP Urination Incident : 'त्याला चूक कळली; आरोपीची सुटका करा' - लघुशंका प्रकरणातील पीडिताची मागणी

पुढारी ऑनलाइन डेस्क : MP Urination Incident : मध्यप्रदेशातील लघुशंका पीडित प्रकरणातील व्यक्तीने आरोपीच्या सुटेकची मागणी केली आहे. तो म्हणाला आरोपीला त्याची चूक कळली आहे, त्यामुळे त्याला आता सोडून द्यावे, असे पीडित व्यक्तीने म्हटले आहे.
पीडित व्यक्तीने शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत सांगितले की, माझी सरकारकडे मागणी आहे की आरोपीकडून चूक झाली. मात्र, पूर्वी जे काही घडले त्याला त्याची चूक कळली आहे. त्यामुळे त्याला सोडण्यात यावे.

यावर आरोपीने अतिशय अपमानास्पद कृत्य करूनही त्याने अशी मागणी केली याबद्दल विचारले असता, पीडितेने सांगितले, होय मी सहमत आहे…तो आमच्या गावचा पंडित आहे. त्याची सुटका करण्याची आम्ही सरकारकडे मागणी करतो, असे पीडित वक्तीने सांगितले.  MP Urination Incident

पुढे पीडित असेही म्हणाला, गावात रस्ता बांधण्याशिवाय सरकारकडे अन्य कोणतीही मागणी नाही. मध्य प्रदेशात वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणार असल्याने या मागणीला महत्त्व येऊ शकते.

MP Urination Incident : नेमके काय आहे प्रकरण

मध्यप्रदेशातील सिधी येथील एका व्यक्तीने एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केल्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. दरम्यान या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. अटक आरोपीचे नाव प्रवेश शुक्ला असे आहे. तसेच त्याच्या घराचे बांधकाम अनधिकृत आहे, असे कारण देऊन त्याच्या घरावर बुलडोझर देखील चालवण्यात आले.

दरम्यान घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या पीडित व्यक्तीला बोलावून त्याचे पाय धुवून त्याचा सन्मान केला. त्याच्या कामाची आणि व्यवसायाची माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सोबतच झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. MP Urination Incident

हे ही वाचा :

Sidhi Viral Video : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यानी पीडित तरुणाचे धुतले पाय!, जाणून घ्या कारण

तुम्ही फक्त आमच्या राज्यात या, एका महिन्यात जागा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन

Back to top button