NCP Ajit Pawar Group Press Conferance : दिल्लीतील राष्ट्रवादीची बैठक अनधिकृत – प्रफुल्ल पटेल | पुढारी

NCP Ajit Pawar Group Press Conferance : दिल्लीतील राष्ट्रवादीची बैठक अनधिकृत - प्रफुल्ल पटेल

पुढारी ऑनलाइन डेस्क : NCP Ajit Pawar Group Press Conferance : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची पत्रकार परिषद सुरू आहे. या परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले लोकांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे. तो दूर करायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेसची 30 जून 2023 ला महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. देवगिरी येथील बंगल्यावर ही बैठक झाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी सर्वानुमते आपला नेता म्हणजेच अध्यक्ष म्हणून निवडले. तसेच अजित पवार यांच्या निवडीचे अर्ज 30 जूनलाच देण्यात आले. निवडणूक आयोगाकडे आम्ही 30 जूनलाच आम्ही पेटीशन दाखल केले आहे.

देवगिरीतील 30 जूनच्या बैठकीतच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मला (प्रफुल्ल पटेल) नियुक्त केले. अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून निवडण्यात आलं. विधानसभेच्या सभापतींना देखील कळवले. विधान परिषदेचे सभापती यांनाही आम्ही त्याच दिवशी कळवले. विधान सभा अध्यक्षांना अजित पवार हे आमचे गटनेते असल्याचे कळवण्यात आले.

काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्याला अधिकृत बैठक म्हणता येणार नाही. कारण पक्षाचे बहुमत अजित पवार यांच्या पाठीशी आहे. नाव आणि चिन्ह आम्हाला मिळावं म्हणून निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला. नव्या नियुक्त्यांबाबत निवडणूक आयोगाला अर्ज देण्यात आला. राष्ट्रवादीच्या घटनेनुसार सर्व प्रक्रिया पार पडली आहे. सर्व प्रकारची अधिकृत कागदपत्रे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर पाहता येतील.

NCP Ajit Pawar Group Press Conferance : अन्य काही महत्वाचे मुद्दे –

जयंत पाटील यांची नियुक्तीच अधिकृत नाही

अपात्रतेची याचिका दाखल करणारे जयंत पाटील अध्यक्ष नाहीत

कोणी-कोणाला काढू शकत नाही

हा अधिकार आता निवडणूक आयोगाकडे

त्यामुळे निवडणूक आयोग यावर निर्णय देईल

राष्ट्रवादीच्या दिल्ली बैठकीतील निर्णय लागू होत नाहीत.

आमच्यावर केलेल्या कारवाया अनधिकृत

 

हे ही वाचा :

Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांची शनिवारी येवला येथे पहिली सभा

चंद्रशेखर घुले-अजित पवार भेटीने कार्यकर्ते बुचकळ्यात

NCP Crisis : दिंडोरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट; झिरवाळ अजित पवार गटात, तर श्रीराम शेटेंची राजकीय गुरू शरद पवारांना साथ

Back to top button