मोठी बातमी! बालासोर ट्रेन अपघातप्रकरणी सीबीआयकडून तिघांना अटक| Odisha Train Accident | पुढारी

मोठी बातमी! बालासोर ट्रेन अपघातप्रकरणी सीबीआयकडून तिघांना अटक| Odisha Train Accident

पुढारी ऑनलाईन डेस्क : Odisha Train Accident : ओडिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने शुक्रवारी मोठी कारवाई केली. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या आरोपींमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सीनियर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश आहे. संशयीत आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 304 आणि कलम 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील महिन्यात 2 जून रोजी, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालगाडीला धडक दिली होती. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डब्बे बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसला आदळले. या भीषण अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, एक हजारांहून अधिक प्रवासी जखमी झाले होते. या भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयच्या चौकशी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली होती.

Back to top button