Mcap of BSE-listed firms | BSE- सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३०१.१० लाख कोटींवर | पुढारी

Mcap of BSE-listed firms | BSE- सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३०१.१० लाख कोटींवर

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात पॉझिटिव्ह ट्रेंड सुरु आहे. यामुळे सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक कायम आहे. आज गुरुवारी सेन्सेक्सने २१५ अंकांनी वाढून ६५,६६२ वर झेप घेतली. तर निफ्टी १९,४६३ वर व्यवहार करत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (market capitalisation) ३०१.१० लाख कोटींवर पोहोचले. बाजार भांडवलाचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (mcap) ३,०१,१०,५२६.१२ कोटी रुपयांच्या सर्वकालीन शिखरावर पोहोचले. (Mcap of BSE-listed firms)

बीएसई सेन्सेक्स २६ जून ते ४ जुलै दरम्यानच्या काळातील विक्रमी तेजीत सुमारे २,५०० अंकांनी वाढला आहे. ४ जुलै रोजी सेन्सेक्स ६५,६७२ अंकांवर पोहोचला होता. हा सेन्सेक्सचा सर्वकालीन उच्चांक आहे. काल बुधवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २९९.९० लाख कोटींवर होते. त्याने आज ३०१ लाख कोटींचा टप्पा पार केला.

सेन्सेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सुमारे २ टक्क्यांनी वाढला आहे. पॉवर ग्रिड, नेस्ले, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचे शेअर्सही तेजीत आहेत. तर इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, मारुती, एचडीएफसी, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत.

एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारात खरेदी कायम ठेवली आहे. त्यांनी बुधवारी १,६०३.१५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. (Mcap of BSE-listed firms)

अमेरिका, आशियाई बाजारात घसरण

दरम्यान, आशियातील सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारात घसरण झाली. अमेरिकेतील शेअर बाजार बुधवारी घसरण झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अतिरिक्त व्याजदरवाढीचे संकेत दिल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) १२९ अंकांनी घसरून ३४,२८८ वर बंद झाला. एस अँड पी निर्देशांक देखील घसरला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिट २५ अंकांनी घसरून १३,७९१ वर आला.

आशियाई बाजारातही कमकुवत स्थिती आहे. MSCI च्या आशिया-पॅसिफिक शेअर्सच्या विस्तृत निर्देशांकात ०.७ टक्के घसरण झाली. जपानचा निक्केई (Japan’s Nikkei) १ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग (Hong Kong’s Hang Seng) आणि तैवानमधील निर्देशांकही घसरला आहे. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button