Maharashtra Politicals:’ही लोकशाही नाही तर…!’ महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर सिब्बल यांचा हल्लाबोल

कपिल सिब्बल
कपिल सिब्बल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. यावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी 'ही लोकशाही नाही तर…'तमाशा' आहे, असे म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणावर ( Maharashtra Politicals) तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे.

सिब्बल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील राजकारण ही लोकशाही नाही तर, हा तमाशा बनला आहे आणि याला देखील कायदा परवानगी देतो असे वाटते. हे सगळं सत्तेच्या भाकरीसाठी आहे, नाही येथील जनतेसाठी, असे म्हणत कपिल सिब्बल यांनी ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर ( Maharashtra Politicals) कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Maharashtra Politicals:'असे' करायला कायदा परवानगी देतो का?- सिब्बल यांचा सवाल

यापूर्वी खासदार कपिल सिब्बल यांनी मागील काही वर्षात भाजपने पाच राज्यातली सरकारे पाडली आहेत, त्यांना असे करायला कायदा परवानगी देतो का? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांना वाटण्याच्या अक्षता दाखवित भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतली सरकारे पाडली होती, असे सांगत सिब्बल पुढे म्हणतात की, मागील काही वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर भाजपने २०१६ साली अरुणाचल प्रदेश व उत्तराखंडमधले सरकार पाडले होते. त्यानंतर २०१९ मध्ये कर्नाटक, २०२० मध्ये मध्य प्रदेश तर २०२२ साली महाराष्ट्रातले सरकार पाडले होते. भाजपला लोकनियुक्त सरकारे पाडण्यास कायदा परवानगी देतो का? हा खरा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी देखील सिब्बल यांनी महाराष्ट्रातील सत्ता नाट्यानंतर केली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news