भाजपने ५ राज्यांतली सरकारे पाडली, कायदा याला परवानगी देतो का? कपिल सिब्बल यांचा सवाल | पुढारी

भाजपने ५ राज्यांतली सरकारे पाडली, कायदा याला परवानगी देतो का? कपिल सिब्बल यांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही वर्षात भाजपने पाच राज्यातली सरकारे पाडली आहेत, त्यांना असे करायला कायदा परवानगी देतो का? असा सवाल ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

राज्याच्या राजकारणात भाजपने योजनेप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांत बंड घडवून योजना यशस्वी केली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी ८ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. राज्यातील या बंडानंतर कपिल सिब्बल यांनी ट्विट करून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांना वाटण्याच्या अक्षता दाखवित भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतली सरकारे पाडली होती, असे सांगत सिब्बल पुढे म्हणतात की, मागील काही वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर भाजपने २०१६ साली अरुणाचल प्रदेश व उत्तराखंडमधले सरकार पाडले होते. त्यानंतर २०१९ मध्ये कर्नाटक, २०२० मध्ये मध्य प्रदेश तर २०२२ साली महाराष्ट्रातले सरकार पाडले होते. भाजपला लोकनियुक्त सरकारे पाडण्यास कायदा परवानगी देतो का? हा खरा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button