NCP crisis : अजित पवार ‘कटाप्पा’ तर शरद पवार ‘बाहुबली’, राष्ट्रवादीची दिल्लीत पोस्टरबाजी | पुढारी

NCP crisis : अजित पवार 'कटाप्पा' तर शरद पवार 'बाहुबली', राष्ट्रवादीची दिल्लीत पोस्टरबाजी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून ठिकठिकाणी पोस्टरबाजीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या ६, जनपथ निवासस्थानाजवळ अजित पवार ‘कटाप्पा’ तर शरद पवार ‘बाहुबली’ असल्याचे दर्शवित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पोस्टर्स लावले आहेत.

‘बाहुबली’ चित्रपटातील कटाप्पा आणि बाहुबली ही पात्रे अतिशय गाजली होती. या पात्रांचा आधार घेत हे पोस्टर्स बनविण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये अजित यांना गद्दार म्हणून संबोधण्यात आले आहे. चित्रपटातील दृष्यानुसार कटाप्पाप्रमाणे अजित पवार हे शरद पवार यांना पाठीमागून तलवारीने खुपसत असल्याचे दाखविण्यात आले आहे. दरम्यान फिरोजशाह मार्गावरील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरील जुने पोस्टरही हटविण्यात आले आहेत. ज्या पोस्टर्सवर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची छायाचित्रे होती, ती पोस्टर्स काढून नवे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. नव्या पोस्टरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे आहेत.

हेही वाचा : 

Back to top button