IDFC merge with IDFC First Bank | एचडीएफसी नंतर आता आणखी एका बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा

IDFC merge with IDFC First Bank | एचडीएफसी नंतर आता आणखी एका बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा

पुढारी ऑनलाईन : एचडीएफसी बँक- एचडीएफसी विलीनीकरणानंतर आता आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank)- आयडीएफसी (IDFC) विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. IDFC फर्स्ट बँक आणि IDFC च्या संचालक मंडळांनी रिव्हर्स विलीनीकरणाला नुकतीच मान्यता दिली. आता विलीनीकरणासाठी शेअर एक्सचेंज रेशोचा भाग म्हणून IDFC भागधारकांना आधीच्या प्रत्येकी १०० शेअर्समागे IDFC फर्स्ट बँकेचे १५५ शेअर्स मिळणार आहेत. दोन्ही स्टॉक्सचे दर्शनी मूल्य प्रत्येकी १० रुपये आहे, असे IDFC फर्स्ट बँकेने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. (IDFC merge with IDFC First Bank)

दरम्यान, या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये IDFC फर्स्ट बँकेचा शेअर (IDFC First Bank share price) ६ टक्क्यांपर्यंत घसरून दिवसाच्या निचांकी ७७.१० रुपयांवर आला. तर आयडीएफसी (IDFC) चा शेअर ६ टक्क्यांनी वाढला. IDFC च्या शेअर्समध्ये झालेली ही विक्रमी वाढ आहे. IDFC शेअर्सने सर्वकालिन उच्चांक गाठला आहे. तर IDFC फर्स्ट बँकेच्या शेअर्सची गेल्या वर्षी डिसेंबरपासूनची सर्वात इंट्राडे घसरण आहे.

ही विलीनीकरणाची घोषणा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पने एचडीएफसी बँकेत विलीन केल्याच्या काही दिवसांनंतर करण्यात आली आहे, जी भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी आहे.

प्रस्तावित विलीनीकरणामुळे, आर्थिक वर्ष २०२३ नुसार बँकेचा प्रति शेअर स्टँडअलोन बुक व्हॅल्यू ४.९ टक्क्यांनी वाढणार आहे. "विलीनीकरणानंतर ३१ मार्च २०२३ पर्यंत लेखापरीक्षित आर्थिक आकडेवारीनुसार बँकेचे प्रति शेअर बुक व्हॅल्यू ४.९ टक्क्यांनी वाढेल," असे बँकेने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

IDFC चे अध्यक्ष अनिल सिंघवी यांनी म्हटले आहे की, विलीनीकरण हा IDFC च्या कॉर्पोरेट पुनर्रचनेचा शेवटचा टप्पा आहे आणि एक वित्तीय सेवा पुरवठादार तयार करण्यात मदत करेल जे ग्राहकांना सेवांचे अखंड वितरण प्रदान करेल.

१ फेब्रुवारी रोजी IDFC Ltd ने म्हटले होते आहे की त्यांच्या बोर्डाने IDFC First Bank मध्ये सुमारे २,२०० कोटी गुंतवण्यास तत्वत: मान्यता दिली आहे, जेणेकरून सध्याच्या ३६.३८ टक्क्यांवरून इक्विटी होल्डिंग ४० टक्क्यांपर्यंत वाढेल.

आरबीआयने २०१४ मध्ये बंधन बँकेसह IDFC बँकेला परवाना दिला होता. २०१८ मध्ये आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्स्ट लिमिटेडने IDFC First Bank बनण्यासाठी विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली होती. (IDFC merge with IDFC First Bank)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news