Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघात; ‘हृदयद्रावक घटना’ : द्रौपदी मुर्मू | पुढारी

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघात; 'हृदयद्रावक घटना' : द्रौपदी मुर्मू

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे तर सातजण सुखरुप आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबाबत ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. (Buldhana Bus Accident )

कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना : द्रौपदी मुर्मू

बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,”महाराष्ट्रातील बुलढाणा येथे घडलेली हृदयद्रावक घटना, ज्यामध्ये लहान मुले आणि महिलांसह अनेक मौल्यवान जीव गेले आहेत. ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना. त्यांना हे दुःखद नुकसान सहन करण्याची हिंमत मिळो. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते.”

 

हेही वाचा 

 

Back to top button