Stock Market Updates | FII ची गुंतवणूक वाढली! सेन्सेक्सची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ६४,५५० पार

Stock Market Updates | FII ची गुंतवणूक वाढली! सेन्सेक्सची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ६४,५५० पार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या मजबूत आर्थिक डेटामुळे मंदीची भीती कमी झाली आहे. जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात आजही तेजीचे वातावरण कायम राहिले. आज शुक्रवारी (दि.३०) सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. आज दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ६३४ अंकांनी वाढून ६४,५५० वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) १७२ अंकांच्या वाढीसह १९,१४४ वर व्यवहार करत होता. याआधीच्या सत्रात सेन्सेक्स ६३,९१५ वर बंद झाला होता. आज तो ६४,०६८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने आज ६४,५०० अंकांचा आकडा पार करत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी कायम ठेवली. बाजारातील तेजीत आयटी आणि बँकिंग शेअर्स आघाडीवर आहेत. (Stock Market Updates) गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स जवळपास १५०० अंकांनी वाढला आहे. यामुळे पहिल्यांदाच त्याने आजच्या व्यवहारात ६४,५०० वर झेप घेतली.

बाजार भांडवल २९५.७२ लाख कोटींवर

दरम्यान, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात २९५.७२ लाख कोटींच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. यापूर्वी २१ जून रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २,९४,३६,५९४ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले होते. आज बाजार भांडवल (mcap) २,९५,७२,३३८ कोटी रुपयांवर पोहोचले.

त्यात मान्सूनची वेगाने प्रगती आणि आरबीआयची व्याजदर स्थिर ठेवण्याची भूमिका बाजाराच्या तेजीसाठी पोषक ठरली आहे. तसेच बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर एम अँड एम, इंडसइंड बँक, सन फार्मा, इन्फोसिस, टीसीएस, मारुती, टाटा मोटर्स, विप्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक हे शेअर्स वधारले आहेत. तर एनटीपीसी, आयसीआयसीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी आयटी १.५७ टक्के आणि निफ्टी पीएसयू बँक ०.९७ टक्के वाढले आहेत. वित्तीय, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, फार्मा, रियल्टी आणि आरोग्य सेवा क्षेत्रही वाढले आहे. बँक निफ्टीने ४४,६०० च्या वर झेप घेतली. कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सेवा पुरवठादार कलेरा १०० दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बीएसईवरील शुक्रवारच्या व्यवहारात टाटा कम्युनिकेशन्सचे शेअर्स (Shares of Tata Communications) ४ टक्के घसरून १,५१६ रुपयांवर आले. तर स्टॉकमधील संभाव्य ब्लॉक डीलमुळे शुक्रवारी NSE वर अदानी ट्रान्समिशनचे शेअर सुमारे ४ टक्के घसरले.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण आहे. जपानचा निक्केई घसरला आहे. चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग वाढला आहे.

गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ

NSE डेटानुसार, बुधवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १२,३५० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,०२१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणुकदारांची भारतीय इक्विटीमधील गुंतवणूक १० अब्ज डॉलरवर गेली आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news