आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलैपर्यंत कोठडी | पुढारी

आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलैपर्यंत कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: सीमाशुल्क आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चे अतिरिक्त आयुक्त आणि माजी ईडी अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना ५ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. हिरे व्यापाऱ्याकडून ५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरीत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.२८) अटक केली आहे.

सचिन सावंत  (Sachin Sawant) यांनी यापूर्वी फेडरल एजन्सीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयात उपसंचालक म्हणून काम केले होते. ईडीने मंगळवारी मुंबईतील त्याच्या आणि इतर काहींच्या परिसराची झडती घेतल्यानंतर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या सचिन सावंत लखनऊमध्ये कार्यरत होते.

 

हेही वाचा 

Back to top button