नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकारी अजय भटनागर यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळ मंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. झारखंड कॅडरच्या १९८९ तुकडीचे आयपीएस अधिकारी भटनागर सध्या सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. आदेशानुसार सेवानिवृत्ती पर्यंत २० नोव्हेंबर २०२४ भटनागार या पदावर राहतील. (Ajay Bhatnagar)