बंगल्याच्या नूतनीकरणानंतर केजरीवालांमागे ‘सीएजी’चे शुक्लकाष्ट | पुढारी

बंगल्याच्या नूतनीकरणानंतर केजरीवालांमागे 'सीएजी'चे शुक्लकाष्ट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शासकीय निवासस्थानाचे नूतनीकरणानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.आता केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे ऑडिट भारताचे नियंत्रक व महालेखापालांकडून (सीएजी) केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणात करण्यात आलेले उल्लंघनाचा विशेष तपास केला जाणार आहे. अशा प्रकारच्या चौकशीची शिफारस नायब राज्यपाल कार्यालयाने २४ मे २०२३ मध्ये पत्र लिहून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. याच पत्राच्या आधारे मंत्रालयाने सीएजी मार्फत तपास सुरू केला आहे.

दिल्लीतील ६, फ्लॅग रोड, सिव्हिल लाईन येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्‍या कामांमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आहे. देशात कोरोना महारोगराईचा प्रकोप असताना मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात व्यस्त होते, असा आरोप करण्यात आला होता. या कामादरम्यान प्रचंड पैसे खर्च करण्यात आल्याचा आरोप एलजी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या ऑडिटला परवानगी मिळाल्याने दिल्लीतील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button