Bengal Panchayat Polls : ‘तृणमूल’चे दोन गट भिडले; गोळीबारात एक ठार, ५ जखमी | पुढारी

Bengal Panchayat Polls : 'तृणमूल'चे दोन गट भिडले; गोळीबारात एक ठार, ५ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगाल पंचायत निवडणुकीपूर्वीपासून ( Bengal Panchayat Polls )  सुरु असणारे हिंसाचाराचे सत्र सुरुच आहे. कूचबिहार जिल्‍ह्यात मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्‍या दौर्‍यानंतर दुसर्‍याच दिवशी तृणमूलच्‍या दोन गटातील संघर्षाला हिंसक वळण लागले. गोळीबारात एक कार्यकर्ता ठार झाला तर पाच जण जखमी झाला आहे. ( TMC groups clash )

हिंसाचार प्रकरणी माहिती देताना कूचबिहारचे पोलीस अधीक्षक सुमित कुमार यांनी सांगितले की, गितालदहा येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी एका गटाने केलेल्‍या गोळीबारात तृणमूलच्‍या कार्यकर्ता ठार झाला तर पाच जण जखमी झाले. हा हिंसाचार भाजपनेच घडवून आणल्‍याचा आरोप तृणमूलचे नेते करत आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसाठी ८ जुलै रोजी मतदान होणार आहे; परंतु त्यापूर्वी राज्यात हिंसाचार सुरूच आहे. पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतानाही अनेक ठिकाणाहून हिंसाचाराच्या घटना घडल्‍या होता.

भाजप उमेदवाराच्या घरावर बॉम्ब हल्ला

नादिया जिल्ह्यातील कृष्णगंज पंचायत समिती मतदारसंघातील भाजप उमेदवार कल्पना सरकार यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्‍यात आला. भाजपने तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्‍यान, बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले आहे. विरोधी पक्षांनी केंद्राकडे सुरक्षा दल तैनात करण्याची मागणी केली होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा दलाच्या ८०० हून अधिक कंपन्या राज्यात तैनात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button