राजधानी दिल्लीत वीज दर वाढीची शक्यता; वीज वितरण कंपन्यांच्या प्रस्तावाला डीईआरसीची मंजूरी

राजधानी दिल्लीत वीज दर वाढीची शक्यता; वीज वितरण कंपन्यांच्या प्रस्तावाला डीईआरसीची मंजूरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत वीज दर महागण्याची शक्यता आहे. दिल्ली वीज नियामक आयोगाने (डीईआरसी) वीज खरेदी करार दराच्या (पीपीएसी) माध्यमातून दिल्लीतील वीज शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली आहे. बीएसईएस क्षेत्रात वीज वापर १० टक्क्यांपर्यंत महागणार आहे. तुर्त यावर राज्य सरकारकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. वाढीव वीज दरांचा ग्राहकांवर प्रभाव पडणार नाही, असे सरकारकडून एका निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

डीईआरसी ने पॉवर डिस्कॉम, बीवायपीएल (बीएसईएस यमुना) आणि बीआरपीएलची (बीएसईएस राजधानी) याचिका स्वीकारली आहे. वीज दरामध्ये होणाऱ्या वाढीचा प्रभाव दक्षिण, पश्चिम दिल्लीसह दिल्ली ट्रान्स-यमुना क्षेत्र, जुनी आणि नवी दिल्लीत राहणाऱ्या वीज ग्राहकावर पडेल. नवी दिल्ली नगर परिषदेच्या (एनडीएमसी) भागातील ग्राहकांवर वाढीव वीज दराचा प्रभाव पडणार आहे.
वीज कंपन्यांनी मात्र ही सामान्य प्रक्रिया असल्याचे सांगितले. वीज पुरवठादार कंपन्यांकडून वीज खरेदी करारानूसार वीज दर वाढवण्याचा प्रस्तावावर डीईआरसीची मंजूरी घ्यावी लागते. यंदा त्यास मंजुरी मिळाली आहे. विजेचे नवीन दर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिल्लीकरांच्या सुचनेनूसार यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. वीज दराच्या वाढीचा प्रभाव दिल्लीकरांवर पडणार नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news