Gold Prices : दिवाळीआधीच सोने तेजीत, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव | पुढारी

Gold Prices : दिवाळीआधीच सोने तेजीत, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिवाळीच्या आधीच सोने आणि चांदी दरात तेजी आली आहे. सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा दर (Gold Prices) ४८ हजारांवर गेला आहे. काल सोमवारी (दि.२५) २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर (१० ग्रॅम) ४८,१४२ रुपये होता. त्यात आज मंगळवारी वाढ होऊन तो ४८,३४६ रुपयांवर पोहोचला. सोन्याप्रमाणे चांदीदेखील तेजीत आहे. चांदीचा प्रति किलो दर ६५,७९३ रुपयांवर पोहोचला आहे. डॉलर कमजोर झाल्याने सोन्याला झळाळी मिळत आहे. त्यात सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याला मागणी वाढली आहे. यामुळे सोने तेजीत आले आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Prices Today मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४८,३४६ रुपये, २३ कॅरेट सोने ४८,१५२ रुपये, २२ कॅरेट सोने ४४,२८५ रुपये, १८ कॅरेट ३६,२६० रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २८,२८२ रुपये होता. तर चांदीचा प्रति किलो दर ६५,७९३ रुपये होता. (हे मंगळवार दुपारपर्यंतचे अपडेटेड दर असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button