Biomitric Attendence : केंद्रीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; सरकारचे निर्देश

Biomitric Attendence : केंद्रीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; सरकारचे निर्देश

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागांना आधारशी जोडलेल्या बायोमेट्रिक प्रणालीद्वारे कर्मचार्‍यांची उपस्थिती नोंदवण्याची प्रणाली अनिवार्य करण्यास सांगितले आहे. सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हजेरीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारींनंतर सरकारने हे निर्देश दिले आहेत.

आधार सक्षम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम (AEBAS) केंद्र सरकारची मंत्रालये, त्यांचे संलग्न विभाग आणि सरकारी संस्थांच्या कार्यालयांमध्ये जोडण्यात आली आहे. ज्या कार्यालयांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे, त्या कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्यामार्फत हजेरी नोंदवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नुकत्याच केलेल्या आढाव्यात दिसून आले. त्यामुळे कार्मिक मंत्रालयाने नव्याने आदेश जारी करण्याची ठरवले. यापुढे हजेरी लावण्यात होणारा हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या नोटमध्ये, बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती अनिवार्यपणे करण्यास सांगितले आहे.

सर्व मंत्रालयांमध्ये होणार लागू

हजेरीची ही प्रणाली सर्व मंत्रालये आणि विभागांच्या कर्मचार्‍यांना अनिवार्यपणे पाळावी लागेल. बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदवण्याच्या यंत्रणेचे काटेकोर पालन करण्याची खातरजमा करण्यासाठी विभागप्रमुखांना सांगण्यात आले आहे. कार्यालयात उशिरा येणाऱ्या आणि लवकर निघणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news