CoWIN Data Leak: CoWin पोर्टल डेटा लीक प्रकरणात बिहारमधून एकाला अटक | पुढारी

CoWIN Data Leak: CoWin पोर्टल डेटा लीक प्रकरणात बिहारमधून एकाला अटक

पुढारी ऑनलाईन: CoWin पोर्टल डेटा लीक प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष IFSO युनिटने बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर CoWin पोर्टलवरील भारतीयांचा डेटा टेलिग्रामवर लीक (CoWIN Data Leak) करून व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित संशियत आरोपीची आई बिहारमध्ये आरोग्य सेविका आहे, असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याने कोविड काळात लसीकरणादरम्यान मोदी सरकारकडून कोट्यवधी लोकांचा डेटा लीक (CoWIN Data Leak) झाल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले होते. पुढे तपासादरम्यान कथित CoWin पोर्टल डेटा लीक प्रकरणासंदर्भात एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

CoWIN Data Leak: काय आहे प्रकरण

कोविड काळात लसीकरणादरम्यान घेण्यात आलेला कोट्यवधी लोकांचा डेटा मोदी सरकारकडून लीक झाला आहे. यामध्ये व्यक्तीचा वैयक्तिक तपशील, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, पासपोर्ट क्रमांक, मतदार ओळखपत्र, कुटुंबातील सदस्यांचे तपशील इ. लीक (CoWIN Data Leak) केला गेला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्याकडून करण्यात आला आहे.

या गंभीर आरोपानंतर CoWIN, कोविड-19 लसीकरण नोंदणी पोर्टल, जन्मतारीख आणि पत्त्यासह व्यक्तीचे कोणतेही वैयक्तिक तपशील संकलित करत नाही. या पोर्टलवर केवळ व्यक्तीने पहिला, दुसरा डोस घेतलेली तारीख दिले जाते. तसेच बुस्टर डोस घेतला असल्यास त्याची नोंद करण्यात येते, असे सरकारकडून स्पष्ट केले होते. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने CoWIN डेटा लीकच्या तपशील अहवालावर आम्ही काम करत आहे. सध्या या आरोपासंदर्भातील अधिक माहिती तपासली जात आहे, असे म्हटले होते.

हेही वाचा:

Back to top button