China LPG Gas Leak: चीनमधील रेस्टॉरंटमध्ये LPG गॅसचा स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू | पुढारी

China LPG Gas Leak: चीनमधील रेस्टॉरंटमध्ये LPG गॅसचा स्फोट; ३१ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन: चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एलपीजी गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात ३१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना चीनच्या वायव्य शहर यिनचुआनमधील एका रेस्टॉरंटमध्ये (China LPG Gas Leak) बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. द्रव वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याची माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे. या दुर्घटनेत सातजण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

China LPG Gas Leak: ड्रॅगन बोट फेस्टिव्हलदरम्यान ही दुर्घटना

यिनचुआनच्या निवासी भागातील फुयांग बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यिनचुआन ही चीनमधील नानजिंग प्रांताची राजधानी आहे. चीनमध्ये सध्या तीन दिवसांचा ड्रॅगन बोट फेस्टिव्हल (China LPG Gas Leak) सुरू आहे. अशा परिस्थितीत लोक मोठ्या संख्येने बाहेर जाऊन मित्रांसोबत पार्टी करतात. या दरम्यान ही घटना घडली आहे.

राष्ट्रपतींनी  दिले सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश

या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक पथकांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला ते रेस्टॉरंट पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या रेस्टॉरंटच्या शेजारी इतरही अनेक रेस्टॉरंट्स असल्याने आग इतर रेस्टॉरंटमध्येही पसरण्याचा धोका होता, मात्र वेळीच आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्व उद्योगांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा:

Back to top button