समलैंगिक प्रेम… लिंग बदलाचे मांत्रिकाचे आमिष आणि पुढे घडलं अक्रित…

समलैंगिक प्रेम… लिंग बदलाचे मांत्रिकाचे आमिष आणि पुढे घडलं अक्रित…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एक धक्‍कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथे दोन लेस्बियन मुलींमध्‍ये प्रेम संबंध जुळले. मुलीला मुलगा होण्याचे आमिष दाखवत मांत्रिकाचे तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह आणि मांत्रिकाला अटक केली आहे.

याप्रकरणी माहिती देताना पोलीस अधीक्षक एस. आनंदन यांनी सांगितले की, पोलिस अधीक्षक (एसपी) एस. आनंदने सांगितले की, शाहजहांपूर येथील आरसी मिशन पोलिस स्टेशन परिसरात राहणार्‍या तरुणीचे (वय ३०) पुवायन येथील रहिवासी संशयित आरोपी प्रीतीसोबत (वय २४) मैत्री झाली. त्‍यांच्‍यात समलैंगिक संबंध प्रस्थापित झाले. आपल्‍या मैत्रीणीला लिंग बदल करुन मुलगा व्हायचे असल्‍याचे प्रीतीने तिच्‍या आईला सांगितले.

मांत्रिकाच्‍या मदतीने रचला  हत्‍येचा कट

प्रीती आणि तिची आई उर्मिला यांनी शाहजहांपूर मोहम्मदी भागातील मांत्रिक रामनिवास याची भेट घेतली. प्रीतीच्या आईने मांत्रिकाला खुनासाठी दीड लाखांची सुपारी दिली. दोघींनी तरुणीच्‍या खूनाचा कट रचला. लिंग बदलून मुलगा बनवतो, असे आमिष मांत्रिकाने तरुणीला दाखवले. १३ एप्रिल रोजी संबंधित तरुणी बेपत्ता झाली. यानंतर तिच्‍या नातेवाईकांनी पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली.
आरसी मिशन पोलिस स्टेशनच्‍या कर्मचार्‍यांनी या प्रकरणी सखोल तपास केला. यावेळी दोन तरुणींमधील संबंध उघड झाले. तसेच प्रीती एका तरुणीला घेवून मांत्रिकाकडे गेल्‍याची माहितीही उघड झाली. पोलिसांनी मांत्रिक रामनिवासला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याने गुन्हा कबूल केला.

लिंग बदलाच्‍या बहाण्‍याने तरुणीचा निर्घृण खून

मांत्रिक तरुणीला घेवून जंगलात गेला. लिंग बदलाच्‍या बहाण्‍याने तिला डोळे मिटून नदीच्या काठावर झोपण्यास सांगितले. यानंतर त्‍याने तिचा गळा चिरला. या प्रकरणी मांत्रिक रामनिवास आणि संशयित आरोपी प्रीती या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मांत्रिकाच्‍या घरातून हत्येसाठी वापरलेले शस्‍त्र जप्त केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news