‘योग दिना’निमित्त काँग्रेसचे ट्विट, शशी थरुरांनी रिट्विट करत केले सरकारचे कौतुक! | पुढारी

'योग दिना'निमित्त काँग्रेसचे ट्विट, शशी थरुरांनी रिट्विट करत केले सरकारचे कौतुक!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्त काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू योग करतानाचे छायाचित्र काँग्रेसने शेअर केले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी रिट्विट करत म्‍हटलं आहे की, “आमच्या सरकारसह ज्यांनी योगाला पुनरुज्जीवित केले आणि लोकप्रिय केले त्या सर्वांना आपण देखील मान्य केले पाहिजे.” ( Yoga Day tweet )

Yoga Day tweet : काँग्रेसने केले पं नेहरूंचे छायाचित्र शेअर

काँग्रेस पक्षाने आज केलेल्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही पं. नेहरूंचे आभार मानतो, ज्यांनी योग लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा उचलला आणि त्याला राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवले.”आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये प्राचीन कला आणि तत्त्वज्ञानाचे महत्त्व जाणून घेऊया आणि आपल्या जीवनात त्याचा समावेश करण्यासाठी पावले उचलूया,” असेही पक्षाने म्हटले आहे. काँग्रेसने नेहरूंचा योगा करतानाचा आणि हेडस्टँड करतानाचा फोटोही शेअर केला आहे.

खरंच! आमचे सरकार…

काँग्रेसच्या ट्विटला टॅग करत थरूर यांनी म्‍हटलं आहे की, “खरंच! आमचे सरकार, @PMOIndia आणि @MEAIindia, यासह ज्यांनी योगाला पुनरुज्जीवित केले आणि लोकप्रिय केले. आपण हे मान्य केले पाहिजे. @UN द्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आंतरराष्ट्रीयीकरण.”
जसा मी अनेक दशकांपासून युक्तिवाद केला आहे, योग हा जगभरातील आपल्या सॉफ्ट पॉवरचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याला मान्यता मिळाल्याचे पाहून खूप आनंद झाला,” असेही शशी थरुर यांनी आपल्‍या ट्विटमध्ये नमूद केले आहे. दरम्‍यान, शशी थरुर यांच्‍या  रिट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी सरकारमध्‍ये केव्‍हा सहभागी हाेणार असा सवाल केला आहे.

योगासनांमुळे मानवाला होणारे शारीरिक व मानसिक फायद्यांबाबत जगभरात जागरुकता निर्माण व्‍हावी, यासाठी डिसेंबर २०१४ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button