Heatwave | देशात उष्माघात वाढला, आरोग्यमंत्री मांडविया यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक | पुढारी

Heatwave | देशात उष्माघात वाढला, आरोग्यमंत्री मांडविया यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

पुढारी ऑनलाईन : देशातील अनेक भागांत उष्णतेची लाट आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya)  आज मंगळवारी सकाळी देशभरातील उष्णतेच्या लाटेबाबत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. (Heatwave)

देशातील काही भागात मान्सून दाखल झाल्यानंतरही अनेक राज्ये अजूनही गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने त्रस्त आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात उष्णतेच्या लाटेने उष्माघाताचा धोका वाढला आहे.

पुढील दोन दिवसांत उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतील काही भागात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department) व्यक्त केली आहे. (Heatwave)

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेने अनेकांचा बळी घेतला आहे. बिहारमधील गया येथे तापमानाचा पारा वाढल्याने सोमवारी दोघांना आपला जीव गमवावा लागला. बिहारमधील अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेजमध्ये दोघांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशात तीव्र उष्णतेची लाट आहे. गेल्या रविवारच्या २४ तासांत बलिया जिल्हा रुग्णालयात १४ नवीन मृत्यू आणि १७८ रुग्ण दाखल झाल्याची नोंद झाली आहे. १५ जून ते १८ जून या चार दिवसांत उष्माघाताने येथील मृतांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. राज्य सरकार उष्माघाताच्या मृत्यूच्या वाढीचा तपास करत आहे.

१५ जून रोजी सुमारे १५४ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २३ जणांचा मृत्यू झाला. १६ जून रोजी १३७ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २० जणांचा मृत्यू झाला. १७ जून रोजी रुग्णालयात ११ मृत्यूची नोंद झाली आणि १८ जून रोजी १७८ रुग्णांना दाखल करण्यात आले आणि १४ मृत्यूची नोंद झाली होती.

हे ही वाचा :

Back to top button