HeatWave: उत्तरेत उष्णतेचा कहर; उष्माघाताने तीन दिवसांमध्‍ये घेतला ९८ जणांचा बळी | पुढारी

HeatWave: उत्तरेत उष्णतेचा कहर; उष्माघाताने तीन दिवसांमध्‍ये घेतला ९८ जणांचा बळी

पुढारी ऑनलाईन : उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम असून, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन दिवसांत उष्णतेमुळे (HeatWave) किमान ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात ५४ जणांचा तर बिहारमध्ये अतिउष्ण हवामानामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.

उत्तर भारतात उष्णतेने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या तडाख्याने गेल्या ७२ तासांपासून आत्तापर्यंत ५४ जणांचा बळी घेतला आहेत. तर उष्माघाताने प्रकृती बिघडल्‍यामुळे ४०० जणांना रूग्णालयात दाखल केले आहे.

उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल ४०० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. उष्माघाताने (Heat Wave) रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्‍याचे डॉक्टरांनी सांगितले.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्‍ये तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे  ताप, श्वासोच्छवासाचा त्रास, हार्ट ॲटॅक, स्ट्रोक आणि इतर गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत आहेत.येथील रूग्णालये सध्या अलर्ट मोडवर असून, आरोग्य कर्मचारी देखील सतर्क आहेत. जिल्हा रूग्णालयात इतकी गर्दी आहे की, रूग्णांना स्ट्रेचर देखील मिळू शकत नाही आणि बरेचसे कर्मचारी रूग्णांना खांद्यावर घेऊन आपत्कालीन वॉर्डमध्ये (HeatWave) दाखल हाेत असल्‍याचे चित्र आहे.

जिल्हा रुग्णालय बलियाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक एस.के.यादव म्हणाले की, १५ जूनला २३, १६ जूनला २० आणि १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अति उष्मामुळे श्वसनाचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि रक्तदाबाच्या रुग्णांचा धोका वाढतो. याठिकाणी तापमानाचा पारा काही प्रमाणात वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला असावा, असे देखील येथील काही तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा:

Back to top button