

पुढारी ऑनलाईन: गोरखपूर येथील गीता प्रेसला २०२१ चा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा आज (दि.१९ जून) संस्कृती मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंडाळाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून (Gandhi Peace Prize-2021) दिली आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मत व्यक्त करताना पीएम मोदी म्हणाले, यंदाचा गांधी शांतता पुरस्कार २०२१ हा गोरखपूर येथील गीता प्रेसला देण्यात येत आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी गेल्या १०० वर्षांत लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी गीता प्रेसचे उत्कृष्ट योगदान आहे. असे मत देखील पीएम मोदी यांनी व्यक्त केले (Gandhi Peace Prize-2021)आहे.
राष्ट्रपिता महात्मा यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांच्या आदर्शांना आदरांजली म्हणून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. १९९५ पासून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. १ कोटी रूपये, सन्मानपत्र, फलक आणि पारंपारिक हस्तकला असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारताची वैभवशाली प्राचीन सनातन संस्कृती आणि धर्मग्रंथ आज सहज वाचता येत असतील, तर ते गीता प्रेसच्या अतुलनीय योगदानामुळे आहे. गीता प्रेसला २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करणे हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे, असे मत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवरून व्यक्त केले आहे.