

पुढारी ऑनलाईन डेस्क : गांधी शांती पुरस्कार २०२१ साठी गीता प्रेस गोरखपूरची निवड करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरींनी गीता प्रेसला हा पुरस्कार देण्याचा निर्णय एकमताने घेतला. गीता प्रेसला 'अहिंसा आणि गांधीवादी मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात बदल घडवून आणण्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल' हा पुरस्कार दिला जात आहे.