पंतप्रधानांचा अमेरिका दौरा सर्वोच्च सन्मान : एस.जयशंकर | पुढारी

पंतप्रधानांचा अमेरिका दौरा सर्वोच्च सन्मान : एस.जयशंकर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधानांचा अमेरिकेचा राजकीय दौरा सन्मानाच्या दृष्टिने सर्वोच्च आहे. काहींनाच हा सन्मान मिळतो. पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान दुसऱ्यांदा अमेरिका काँग्रेसला संबोधित करतील. दौऱ्याचे महत्व त्यामुळे आणखी वाढले आहे, अशी भावना परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी शनिवारी व्यक्त केली. देश ‘विकास तीर्थ यात्रा’ करीत आहे. आश्वासने कुणीही देवू शकतो, पंरतु निश्चित कालावधीत सेवा, योजना पुर्ण करणे हीच मोदी सरकारची भक्कम बाजू आहे, असे देखील परराष्ट्र मंत्री म्हणाले. ‘संपर्क ते समर्थन’ या भाजपच्या जनसंपर्क अभियानानिमित्त बदरपूर येथे आयोजित कार्यक्रमातून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना डॉ.जयशंकर म्हणाले की, निवडणुकीनंतर दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. मात्र मोदी सरकारमध्ये लोकापर्यंत सेवा आणि योजना पोहचत असल्याचे दिसून येते. बदरपूर मध्ये एनटीपीसीचे थर्मल पॉवर प्लान्ट विकसित करण्यात आला आहे. इको पार्क योजनेवरही काम सुरू असून डिसेंबर अखेपर्यंत त्याचे उद्घाटन होईल, असे ते म्हणाले. एनटीपीसी आणि इतर हरित योजनेवर काम करणारे पक्षाचे खासदार आणि स्थानिक नेतृत्वाचे जयशंकर यांनी कौतुक केले.

‘इको पार्क’ दिल्लीसाठी नवीन ऑक्सिजन हब बनेल. या योजनेचा भाग असलेल्या सर्वांचे अभिनंदन.योजना केवळ प्रदूषणावर आळा घालणार नाही, तर परिसरातील आर्थिक विकासालाही प्रोत्साहन देईल.नागरिकांचे जीवन, व्यापार त्यामुळे सुकर होईल. मोदी सरकार केवळ आश्वासने देत नाही. तर, सरकारने हाती घेतलेल कार्य एका निश्चित कालावधीत पूर्ण करीत लोकांपर्यंत पोहचवले जाते, असा दावा जयशंकर यांनी केला.

‘वितरण’ हीच मोदी सरकारची भक्कम बाजू आहे. आश्वासने कुणीही देवू शकतात. मोदी सरकारसाठी मात्र विकासच पहिली प्राथमिकता आहे. मोदी सरकार प्रतिबद्धतेचे तीर्थ आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. काम करणारे सरकार आणि केवळ आश्वासने देणारे सरकार कुठले हे लोकांना कळले आहे. परराष्ट्रमंत्री म्हणून जगभराचा दौरा करीत असतांना विविध देशांच्या राजधानीमध्ये दिसून येणारे ‘सर्वश्रेष्ठ’ भारतात आणण्याची भूमिका असते. पंतप्रधानांचाही दृष्टिकोण असाच आहे.विदेशातील नदी सफाई असो अथवा स्टेशन बांधकामासाठीचे नवीन तंत्रज्ञान, या आणि यासारखी नाविण्यपूर्ण पद्धत भारतात आणण्यासाठी पंतप्रधान सदैव प्रयत्नरत असतात, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button