

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील द्वारका येथील ओखा बंदरात बिपरजॉय चक्रीवादळाच्या दरम्यान कोळशाच्या मोठ्या साठ्याला आग लागली. बंदराच्या आतील हा बाजूस कोळशाचा साठा होता. चक्रीवादळामुळे उंच लाटा बंदराच्या भिंतींवर आदळल्या. दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे कोळशाचे घर्षण झाल्याने कोळशाने पेट (Coal Stock Fire) घेतला आणि आग लागली. सोसाट्याच्या वाऱ्याने ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. यामधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे वृत्त 'सीएनबीसी'ने दिले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेले महाकाय चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) गुरुवारी रात्री गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. किनारपट्टीवर १२५ किमी प्रतिताशी वेगाने वारे वाहत होते. दरम्यान क्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पडत होता. जोरदार सोसाट्याचा वाऱ्याने कोळशामध्ये घर्षण झाल्याचने द्वारकाजवळील ओखा बंदरावर असलेल्या कोळशाच्या साठ्याने पेट (Coal Stock Fire) घेतला, यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
बिपरजॉय हे चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ येथे धडकले यानंतर ते काही प्रमाणात कमकुवत झाले असून ते आज (दि.१६ जून) संध्याकाळपर्यंत ते 'डिप्रेशन'मध्ये जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा राजस्थानमधील दक्षिण भागावर प्रभाव जाणवणार असून, राजस्थानमध्ये मुसळधार पावस पडणार आहे. असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.
चक्रीवादळाने कच्छ आणि सौराष्ट्रात हाहाकार उडाला असून जोरदार वाऱ्यामुळे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी मोबाईल टॉवर, वीज आणि ट्रान्समिशनचे खांब कोसळले आहे. कच्छमधील घरांची पडझड झाली आहे. चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये गुजरातमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे २३ जण जखमी झाले असून २४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळ धडकण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे.