घाऊक महागाई निर्देशांक तीन वर्षांच्या नीचांकी स्तरावर | पुढारी

घाऊक महागाई निर्देशांक तीन वर्षांच्या नीचांकी स्तरावर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ महागाई निर्देशांकापाठोपाठ घाऊक महागाई निर्देशांकातही (डब्ल्यूपीआय) मोठी घट झाली आहे. सरत्या मे महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक उणे 3.48 टक्के इतका नोंदविला गेला. याआधी एप्रिल महिन्यात हा निर्देशांक उणे 0.92 टक्के इतका नोंदविला गेला होता. (wholesale price inflation)

‘डब्ल्यूपीआय’ निर्देशांक आता तीन वर्षांच्या नीचांकी स्तरावर आला आहे. खाद्यान्न, इंधन श्रेणीतील वस्तूंसह निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर कमी झाले आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात डब्ल्यूपीआय निर्देशांक उणे नोंदवला गेला आहे, हे विशेष. यापूर्वी मे 2020 मध्ये हा निर्देशांक उणे 3.37 टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. सरत्या मेमध्ये भात, दूध, डाळी, गहू यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. वार्षिक तत्वावर भाजीपाल्याचे दर 20.71 टक्क्याने, बटाट्याचे दर 18.71 टक्क्याने, कांद्याचे दर 7.25 टक्क्याने कमी झाले आहेत. ( wholesale price Inflation )

हेही वाचा : 

 

Back to top button