Solar Panel Waste : २०५० पर्यंत सौर पॅनलचा कचरा २०० दशलक्ष टन! | पुढारी

Solar Panel Waste : २०५० पर्यंत सौर पॅनलचा कचरा २०० दशलक्ष टन!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कार्बन उत्सर्जनाविरोधात सौर पॅनलकडे एक शस्त्र म्हणून पाहिले जाते; पण ते खराब झाल्यानंतर स्वत:च पर्यावरणासाठी एक नवी समस्या ठरू शकतात. सौर पॅनलची जगभरातील संख्या सुमारे 2.5 अब्ज झाली आहे. सौर पॅनलचे कमाल आयुष्य 25 वर्षे असते. या अर्थाने जगभरातील कोट्यवधी सौर पॅनलचे आयुष्य संपण्याची वेळ आता जवळ आली आहे. कालबाह्य झालेल्या या सौर पॅनलचे करायचे काय? नाही म्हणायला फ्रान्समध्ये जून 2023 मध्ये सौर पॅनल रिसायकलिंग फॅक्टरी सुरू होणार आहे; पण हा एक कारखाना जगाची समस्या सोडवू शकणार नाही. (Solar Panel Waste)

आणखी १० वर्षे निभावणार (Solar Panel Waste)

2030 पर्यंत जगभरात 4 दशलक्ष टन सौर कचरा जमा होईल, ज्याचे व्यवस्थापन करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 2030 पर्यंत भारतात 34 हजार 600 टन सौर पॅनल कचरा जमा होईल. (स्रोत : नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया) 2050 पर्यंत जगभरात 200 दशलक्ष टन सोलर पॅनल कचरा साचेल, तेव्हा मात्र समस्या उद्भवेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे होणार नुकसान

  • सौर पॅनलमध्ये उष्णता परिवर्तित करण्यासाठी काही द्रव वापरले जातात. हे द्रव पर्यावरणाला धोकादायक असतात.
  • अनेक मानवी आजारही त्यामुळे होऊ शकतात. ते मातीची गुणवत्ता खराब करू शकतात.
  • पॅनलमधील चांदी, तांबे काढून टाकणे व कचर्‍याचा पुनर्वापर करणे एकुणात कठीण आहे. (Solar Panel Waste)

कचर्‍यातून हे शक्य, हे अशक्य

  • काचेचा टाईल यातून बनवता येतो. सँडब्लास्टिंगमध्येही वापर शक्य.
  • डांबर बनवायच्या इतर सामग्रीमध्ये ते मिसळले जाऊ शकते.
  • नवीन सोलर पॅनल बनवण्यासाठी मात्र त्याचा वापर करता येत नाही.

अधिक वाचा :

Back to top button