सूर्यफूल ‘एमएसपी’ प्रश्‍नी हरियाणातील शेतकरी आक्रमक, कुरुक्षेत्रमध्‍ये दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखला | पुढारी

सूर्यफूल 'एमएसपी' प्रश्‍नी हरियाणातील शेतकरी आक्रमक, कुरुक्षेत्रमध्‍ये दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सूर्यफूल पिकाच्या खरेदीमध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) न मिळाल्‍याने हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.  राज्‍य शासनाच्‍या निषेधार्थ संतप्‍त शेतकरी रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी आज ( दि. १२) दुपारी कुरक्षेत्रमध्‍ये (Kurukshetra)  दिल्‍ली-चंदीगड महामार्ग रोखला. या आंदाेलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्‍कळीत झाली. या मार्गावरील  वाहतूक व्‍यवस्‍थेत बदल करण्‍यात आल्‍याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली.

सूर्यफुल पिकास किमान आधारभूत किमतीच्या मागणीसाठी आज ( दि.१२) महापंचायतीचे आयोजन करण्‍यात आले होते. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही महामार्ग रोखेलानाही. महामार्गावरील वाहतूक ठप्‍प करणे योग्य नाही. यापूर्वी शेतकऱ्यांची महापंचायत झाली होती. या प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापंचायतीला संबोधित करताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, सरकारने एमएसपी कायद्याची अंमलबजावणी करावी. सूर्यफुलावर एमएसपीची मागणी करणाऱ्या शेतकरी नेत्यांची सुटका करावी. या मागण्‍यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यापूर्वी शेतकरी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या दोन फेऱ्यांच्या बैठकीत एकमत होत नसताना शेतकरी नेते महापंचायतीत सहभागी होण्यासाठी निघून गेले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button