2024 मध्ये पुन्हा मोदीच; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे भाकीत

2024 मध्ये पुन्हा मोदीच; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे भाकीत
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील; पण ते आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत, असे भाकीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी वर्तवले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी स्वत: पंतप्रधानपदावरून बाजूला होतील. कारण, त्यांना देशाचा राष्ट्रपतीही बनायचे आहे, असेही ते म्हणाले.

मुलाखतीत टिकैत यांनी शेतकरी आंदोलन आणि आताचे कुस्तिगीरांचे आंदोलन यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. आगामी निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी विधान केले की, पुढील पंतप्रधानपदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव जाहीर करायला हवे. ते चांगले काम करत आहेत. पण, त्यांना काम करू दिले जात नाही. असे असले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील. पण मोदी आपला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. ते मध्येच पदावरून पायउतार होतील, असे खळबळजनक विधान त्यांनी केले. ते म्हणाले की, मोदी यांना देशाचे राष्ट्रपतीही व्हायचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news