

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत आम आदमी पार्टी (आप) केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी रामलीला मैदानावर महामोर्चा काढणार आहे. यापूर्वी भाजपने 'सिर्फ एक बंदा काफी है…' या नव्या चित्रपटाचा आधार घेत 'महा घोटाळा' पोस्टरने केजरीवालांवर निशाणा साधला आहे. 'आप महा घोटाळा' नावाचे नवीन पोस्टर जारी केले आहे. भाजपच्या दिल्ली युनिटने आपल्या ट्विटरवर एक नवीन पोस्टर शेअर केले आहे.
आप आज रामलीला मैदानातून महामोर्चा काढणार आहे. भाजपने अरविंद केजरीवाल यांना उत्तर देण्यासाठी यांच्या पक्षाला टक्कर देण्यासाठी 'आप महा घोटाळा' नावाचे नवीन पोस्टर जारी केले आहे. हे पोस्टर अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या नवा चित्रपट 'एक बंदा काफी है' वरून घेतले आहे.
केजरीवाल यांनी त्यांच्या घराच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च केले. याचे उत्तर द्या?, असा सवालही या पोस्टरवर केला आहे. भाजपने कॅनॉट प्लेस येथील पालिका बाजार येथून सकाळी ११:४५ वाजता दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधात मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते (एलओपी) रामवीर सिंग बिधुरी आणि खासदार आणि आमदारांसह इतर भाजप नेते हे अभियान सुरू करणार आहेत.
रामलीला मैदानात आणि आजूबाजूला विस्तृत सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत जेथे राष्ट्रीय राजधानीतील सेवा नियंत्रणावरील केंद्राच्या अध्यादेशाविरोधात AAP आज "महा रॅली"चे आयाेजन केले आहे. या रॅलीला सुमारे एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असा दावा आपच्या प्रवक्त्याने केला आहे.
हेही वाचा :