Mumbai Temperature : मुंबईकरांनी अनुभवला जूनमधील गेल्या 45 वर्षातील सर्वात उष्ण दिवस; तापमान @38.50°C | पुढारी

Mumbai Temperature : मुंबईकरांनी अनुभवला जूनमधील गेल्या 45 वर्षातील सर्वात उष्ण दिवस; तापमान @38.50°C

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mumbai Temperature : मुंबईकरांनी काल शनिवारी जूनमधील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस अनुभवला आहे. मुंबई मध्ये काल शनिवारी (दि.10) 38.50°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2014 मध्ये जूनमधील सर्वाधिक तापमान 38°C इतके नोंदवण्यात आले होते, अशी माहिती IMD मुंबई ने दिली आहे. हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले की ते 1979 पासून रेकॉर्ड ठेवत आहेत. कालचा शनिवार हा 1979 पासून 2023 गेल्या 45 वर्षातील जूनमधील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला.

याची अधिक माहिती देताना IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेतील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी, समुद्राचे वारे आणि दक्षिणेकडील वाऱ्यांना विलंबामुळे पारा पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे तापमान वाढल्याचे म्हटले आहे.सांताक्रूझ केंद्रावर तापमानाचा नवा उच्चांक नोंदवण्यात आला. कुलाबा वेधशाळेत दिवसाचे तापमान ३४.५ (Mumbai Temperature)अंश होते. मुंबईच्या पश्चिम-नैऋत्य दिशेला 620 किमी अंतरावर असलेल्या चक्रीवादळामुळे शनिवारी शहरात जोरदार वारेही दिसले.

शनिवारी संध्याकाळी उशिरा शहराच्या काही भागांत हलका पाऊस झाला असला तरी, दिवसाच्या सुरुवातीच्या काळात 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तेव्हा जूनच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. (Mumbai Temperature)

कोकण हवामान ब्लॉग चालवणारे अभिजित मोडक म्हणाले, “सांतक्रूझने जूनच्या तापमानाचा सर्वकालीन विक्रम 38.5 इतका नोंदवला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे की जून 2014 मध्ये नानुआक चक्रीवादळामुळे 38 अंश सेल्सिअस तापमान होते.

हे ही वाचा :

Rain forecast : महाराष्ट्राला यलो अलर्ट; पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

Biporjoy Cyclone | पुढील २४ तासांत ‘बिपरजॉय’ उग्र रुप धारण करणार, ‘या’ राज्यांना अलर्ट

Back to top button