Praful Patel : देशाचे कंत्राट मिळाल्याच्या अर्विभावात वावरू नका! प्रफुल्ल पटेल यांचा मोदी सरकारला इशारा | पुढारी

Praful Patel : देशाचे कंत्राट मिळाल्याच्या अर्विभावात वावरू नका! प्रफुल्ल पटेल यांचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाचे कंत्राट मिळाले असल्याच्या अर्विभावात कुणी राहू नये, असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला.यंदा परिवर्तन होणार असून यात शरद पवारांची भूमिका महत्वाची राहील,असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त एनसीपीच्या राष्ट्रीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले,पक्षाची लोकसभेत ताकद निर्माण करीत ती मतदानात आणि संख्येत परिवर्तित करण्याचे आपले कर्तव्य आहे. २६ व्या वर्धापन दिनी पक्षाचे सरकार आणि देशात पक्षांचा झेंडा फडकेल,असा निर्धार करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

लोकशाहीला घातक असलेल्या शक्तींना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांना एकत्रित होण्याची आवश्यकता आहे. मणिपूर, महाराष्ट्रात दंगली होत आहे, देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या प्रतिमेला तडा बसतो आहे. कुस्तीपटू अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांना रस्त्यावर संघर्ष करण्यासाठी बाध्य करणाऱ्या शक्तींच्या पराभवाकरीता एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे पटेल म्हणाले. पवारांच्या नेतृत्वात राज्यातील मविआचे सरकार अनैतिकरित्या बरखास्त करण्यात आले.आता २०२४ च्या लोकसभा निवडणूक विरोधकांनी एकत्रित येवून भाजपचा सामना करण्यासाठी चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी पवार आहेत. विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी ते प्रयत्नरत असल्याचे पटेल म्हणाले.

हेही वाचा

Back to top button