कलम ३७० रद्द केले तेव्हा केजरीवाल कुठे होते? : ओमर अब्दुल्लांचा सवाल | पुढारी

कलम ३७० रद्द केले तेव्हा केजरीवाल कुठे होते? : ओमर अब्दुल्लांचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्‍मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले तेव्हा अरविंद केजरीवाल कुठे होते?, असा सवाल नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केला.
आता इतर पक्षांकडून पाठिंबा मागत आहेत….

राजौरी येथे बोलताना ओमर अब्‍दुल्‍ला म्‍हणाले की, केंद्र सरकारने दिल्‍ली सरकारविरोधात अध्‍यादेश काढला आहे. त्‍यामुळे आता दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री केंद्र सरकारविरोधात अन्‍य राजकीय पक्षांचा पाठिंबा मागत आहेत. जेव्‍हा जम्‍मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले तेव्‍हा त्‍यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला होता. त्‍यावेळी त्‍यांना राज्‍यावर अन्‍याय झाला असे वाटले नाही का, तेव्‍हा केजरीवाल कुठे होते? असा सवाल ओमर अब्‍दुल्‍ला यांनी केला.

हेही वाचा : 

 

Back to top button