भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलाविलेल्या या बैठकीला जे प्रमुख नेते हजर राहणार आहेत, त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संघटन सचिव बी. एल. संतोष यांचा समावेश आहे. याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच राज्यांच्या संघटनात्मक सचिवांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे.