Gauhati HC : ३५ महिन्यांनंतर हायकोर्टाने नागालँडमधील कुत्र्याच्या मटणावरील बंदी हटविली | पुढारी

Gauhati HC : ३५ महिन्यांनंतर हायकोर्टाने नागालँडमधील कुत्र्याच्या मटणावरील बंदी हटविली

गुवाहाटी; वृत्तसंस्था : नागालँडमधील कुत्र्याच्या मांसावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. कुत्र्याच्या मटणावरील 35 महिन्यांच्या बंदीनंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कोहिमा खंडपीठाने हा निकाल दिला. शेकडो वर्षांपासून कुत्र्याचे मटण नागा लोकांचे आवडते खाद्य आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. (Gauhati HC)

या निकालासह नागालँडमध्ये आता कुत्र्यांचा व्यापार, बाजारात कुत्र्यांच्या मांसाची खरेदी-विक्री आणि रेस्टॉरंटमध्येही कुत्र्याचे मांस पूर्ववत उपलब्ध होणार आहे. (Gauhati HC)

जुलै 2020 मध्ये नागालँडमध्ये कुत्र्याच्या मटणावर बंदी घालण्यात आली होती. कोहिमानगर परिषदेच्या चौघा मान्यताप्राप्त श्वानमांस व्यापार्‍यांनी त्याविरोधात ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. न्यायलयाने ती ग्राह्य धरून कुत्र्याच्या मटणावरील बंदी अनुचित ठरवून रद्द केली. (Gauhati HC)

काय म्हणाले न्यायालय?

  • कुत्र्याचे मांस हे नागांनी स्वीकारलेले अन्न आहे.
  • याचिकाकर्त्यांना उदरनिर्वाहाचा अधिकार आहे.
  • कुत्र्याचे मांस हे मानक मानवी अन्न नाही, हे खरे आहे.
  • कुत्र्याचे मांस खाण्याची कल्पना ईशान्येकडील काही भाग वगळता देशासाठी परदेशी आहे.

बंदीनंतर काय झाले होते?

2012 मध्ये नागालँडमध्ये केवळ 7 भटकी कुत्री होती. ही संख्या 2019 मध्ये 342 पर्यंत पोहोचली होती. कुत्र्याच्या मटणावर बंदी येताच गल्लोगल्ली भटकी कुत्री दिसू लागली होती.

अधिक वाचा :

Back to top button