Manipur Violence : मणिपुरातील दंगलीने मायलेकांना जिवंत जाळले | पुढारी

Manipur Violence : मणिपुरातील दंगलीने मायलेकांना जिवंत जाळले

इम्फाळ; वृत्तसंस्था : कुकी आणि मैतेई समुदायांमधील दंगलींनी मणिपूर अद्यापही पेटलेले आहे. द्वेषाच्या या आगीत घरे, वाहनेच नव्हे तर माणुसकीची मूल्येही भस्म झाली आहेत. जखमी अवस्थेत मायलेकाला घेऊन जाणारी ॲम्ब्युलेन्सच कुकींच्या हिंसक जमावाने पेटवून दिली. इम्फाळमध्ये रविवारी घडलेली ही घटना बुधवारी समोर आली आहे. (Manipur Violence)

मणिपुरात शत्रुत्वाने खदखदत असलेल्या मैतेई व कुकी या दोन्हीही समुदायांकडून आजवर घरे, वाहने जाळली गेली, पण दोन्हींपैकी कुणीही रुग्णवाहिका जाळली नव्हती. मणिपूरच्या हिंसाचाराने आता मानवी मूल्यांच्या सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत. (Manipur Violence)

मीना हँगिंग (29) ही आई, तिचा टोन्सिंग हँगिंग (7 वर्ष) हा लेक आणि आणखी एक नातेवाईक लिडिया लॉरेम्बम यांना जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेत 2 हजारांवर हिंसक जमाव आडवा आला आणि रुग्णवाहिकाच पेटवून दिली. आगीनंतर राखेतून फक्त हाडेच आढळून आली आहेत. (Manipur Violence)

मैतेई समुदायातील लोकांनी केलेल्या एका प्रतिहल्ल्यात मीना, टोन्सिंग, लिडिया हे जखमी झाले होते. हे तिघे कुकींसाठीच्या छावणीत होते. तिघांसह रुग्णवाहिका येथूनच रवाना झाली. अर्ध्या वाटेवर हिंसक जमावाने रुग्णवाहिका जाळली. चालक आणि परिचारिका घटनास्थळावरून पळून गेले. पत्नी आणि मुलगा गमावलेल्या जोशुआ हँगिंग यांना धक्का बसला आहे.

जिप्सी पेटवली; ४ मृत्यू

सोमवारी इम्फाळमध्ये सेराळ पुलाजवळ काही लोकांनी एक जिप्सी वाहन पेटवून दिले होते, त्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता.

अधिक वाचा :

Back to top button