Train Accident Coromandel Express : 'कुणाचे डोके नव्हते कुणाचे हात..पाय'; २ वर्षांचे बाळ मात्र वाचले; रेल्वे अपघाताचे प्रवाशाकडून वर्णन; मृतांचा आकडा 233 वर | पुढारी

Train Accident Coromandel Express : 'कुणाचे डोके नव्हते कुणाचे हात..पाय'; २ वर्षांचे बाळ मात्र वाचले; रेल्वे अपघाताचे प्रवाशाकडून वर्णन; मृतांचा आकडा 233 वर

पुढारी ऑनलाइन डेस्क : Train Accident Coromandel Express : ओडिसाच्या बालासोर येथील कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा २३३ वर पोहोचला असून ९०० जण जखमी आहे. अपघातातील काही बचावलेल्या प्रवाशांनी या भीषण अपघातातील स्थितीचे वर्णन केले आहे.

”आम्ही S5 बोगीत होतो आणि अपघात झाला तेव्हा मी झोपलो होतो…आम्ही पाहिले की कोणाचेही डोके, हात, पाय नव्हते… आमच्या सीटखाली एक २ वर्षाचा मुलगा होता जो पूर्णपणे सुरक्षित होता. नंतर आम्ही त्याच्या कुटुंबाची सुटका केली. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातातील बचावलेल्या प्रवाशाने घटनेचे वर्णन केले आहे.”

ओडिशाच्या बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी सायंकाळी मोठा अपघात झाला आहे. हा अपघात बालासोर आणि बहानागा रेल्वे स्टेशनजवळ झाला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि एका मालगाडी एक्सप्रेसमध्ये हा अपघात झाला आहे. त्यामुळे रेल्वेचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत.(Train Aओडिशाच्या बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २३३ जणांचा मृत्यू झाला असून ९०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. (Train Accident Coromandel Express)ccident Coromandel Express)

अपघातानंतरचे चित्र भयावह

अपघातात बचावलेल्या एका प्रवाशाने घटनेचे प्रत्यक्ष परिस्थितीचे वर्णन सांगितले. हे वर्णन अगदीच भयावही घडले. हा प्रवासी म्हणाला अपघातावेळी मी एस5 बोगीत झोपलो होतो. अचानक बसलेल्या झटक्याने माझी झोप उघडली. ट्रेन अगदी विचित्र चालू होती. मी जेव्हा आजूबाजूला पाहिले तेव्हा तिथे अनेक प्रवाशी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कोणाचे डोके तर कोणाचे हात-पाय नव्हते. सगळीकडे वाचवा-वाचवा म्हणून आरडा-ओरडा सुरू होता. अपघातानंतरचे चित्र खूपच भयावह होते. आम्हाला काहीच समजत नव्हते. डोके सुन्न झाले होते. तरीही शक्य तेवढ्या जणांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला.

तो पुढे म्हणाला आमच्या सीट खाली एक दोन वर्षाचे बाळ मात्र पूर्णपणे सुरक्षित होते. आम्ही आजूबाजूला त्याच्या कुटुंबीयांना शोधले. त्यांना वाचवून आम्ही त्यांच्याजवळ त्यांचे बाळ दिले. तसेच प्रवाशाने सांगितले की दुर्घटनेनंतरचे चित्र एवढे भयावह आणि बिभत्स होते त्यांना शब्दांमध्ये सांगता येत नाही.

रेल्वेचे डबे बनले स्टीलचे ढिगारे

घटनेत बचावलेल्या आणखी एका यात्रेकरूने सांगितले की ते पश्चिम बंगाल ते मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ब्रह्मपूरचे राहणार आहेत. त्यांचे नाव पियुष पोद्दार आहे. ते कोरोमंडल एक्सप्रेसने तामिळनाडुला निघाले होते. ते म्हणाले आम्हाला एक जोरदार झटका बसला आणि गाडीचे डबे एकाएकी एक तरफ झुकलेले पाहिले. ट्रेन प्रचंड वेगाने रुळावरून खाली उतरून अनेक डबे घसरले. हे इतक्या जलद घडत होते की आमच्यापैकी अनेक जण डब्याच्या बाहेर फेकले गेले. आमच्या चोहीकडे मृतदेह पडले होते. तर रेल्वेचे डबे पूर्णपणे इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाले होते. ते फक्त एक स्टीलचा मोठे ढीग वाटत होते. स्थानिक लोकांनी आरडाओरडा ऐकूण ते मदतीसाठी धावले. थोड्याच वेळात नंतर बचाव पथक तसेच अग्निशामक दलाचे जवान पोहोचले. त्यांनी मदत कार्य सुरू केले. रुळावरून घसरलेल्या डब्याखाली अनेक मृतदेह पडले होते.

स्थानिक लोकांची मदतीसाठी धाव

अपघात झाल्यानंतर आरडाओरडा ऐकूण स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने आम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यांनी फक्त आम्हालाच नव्हे तर आमचे सामानही बाहेर काढण्यास मदत केली. आम्हाला पानी दिले, असे रूपम बॅनर्जी नावाच्या एका प्रवासी महिलेने सांगितले.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू

दरम्यान, अपघातानंतर तातडीने एनडीआरएफची टीम तसेच अन्य बचाव पथक ओडिशात दाखल होऊन बचाव कार्य सुरू आहे. अजूनही बचाव पथकातील जवान रेल्वेखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत.

हे ही वाचा:

ओरिसामधील रेल्वे दुर्घटनेमुळे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन रद्द | Vande Bharat Express Inauguration Canceled

 

Back to top button