मोठी बातमी! भारताच्या उत्पादन क्षेत्राची भरभराट! PMI ३१ महिन्यांच्या उच्चांकावर

पुढारी ऑनलाईन : भारताच्या उत्पादन क्षेत्रात भरभराट झाली आहे. वाढती मागणी आणि आउटपुटमुळे मे महिन्यातील भारतातील कारखान्याचे उत्पादन (India’s manufacturing PMI) ३१ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. तसेच आशादायी वातावरणामुळे कंपन्यांचा नोकरभरती करण्याचा वेगही सर्वाधिक राहिला आहे, अशी एका खासगी सर्वेक्षणाची माहिती गुरुवारी समोर आली.
एस अँड पी ग्लोबल इंडियाद्वारे (by S&P Global) संकलित केलेला मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) एप्रिलच्या ५७.२ वरून मे महिन्यात ५८.७ वर पोहोचला. हा अडीच वर्षातील उच्चांक आहे. सलग २३ व्या महिन्यात PMI हा ५० अंकांच्या वर राहिला आहे.
“देशांतर्गत ऑर्डरमधील चढ-उतारामुळे अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होतो. वाढत्या बाह्य व्यवसायामुळे आंतरराष्ट्रीय भागीदारी वाढून जागतिक बाजारपेठेत भारताचे स्थान उंचावले आहे,” असे S&P ग्लोबलच्या इकॉनॉमिक्स असोसिएट डायरेक्टर पोल्याना डी लिमा यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२१ पासून नवीन ऑर्डर्स सर्वात जलद गतीने वाढल्या. तर परदेशातील मागणी सहा महिन्यांत सर्वात वेगाने वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण सुमारे १२ वर्षांतील उच्चांकावर पोहोचले आहे.
“भारताच्या उत्पादन PMI ने मे मध्ये मोठी वाढ नोंदवली. देशातील उत्पादनांच्या विक्रीतील वाढीमुळे रोजगार आणि खरेदीचे प्रमाण अधिक मजबूत होण्याचा मार्ग मोकळा झाला. पुरवठा साखळी-परिस्थितीत आणखी सुधारणा झाल्यामुळे कंपन्यांनी इनपूट इन्व्हेंटरीजमध्ये विक्रमी साठा नोंदवला,” असे S&P ग्लोबलने एका निवेदनात म्हटले आहे. (S&P Global Purchasing Managers’ Index)
The S&P Global India Manufacturing #PMI posted 58.7 in May (Apr: 57.2) hitting a 31-month high. Stronger increase in new orders boosted input buying growth. Read more: https://t.co/VvrZIXU3PU pic.twitter.com/FVeMvqM2jJ
— S&P Global PMI™ (@SPGlobalPMI) June 1, 2023
हे ही वाचा :