Anti-tobacco warnings | आता OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी सावधगिरीचा इशारा देणे अनिवार्य, अधिसूचना जारी | पुढारी

Anti-tobacco warnings | आता OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी सावधगिरीचा इशारा देणे अनिवार्य, अधिसूचना जारी

Anti-tobacco warnings | आता OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी सावधगिरीचा इशारा देणे अनिवार्य, अधिसूचना जारी
पुढारी ऑनलाईन : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी सावधगिरीच्या इशाऱ्यांसाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्याचा संदेश देणे अनिवार्य आहे. ऑनलाइन कंटेंटच्या पब्लिशरनी या नवीन नियमांचे पालन केले नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय कठोर कारवाई करेल, असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. (anti-tobacco warnings on OTT platforms)

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांचे नियमन केल्यानंतर तंबाखू सेवनाच्या घातक परिणामांविषयी जागृती करण्यात भारत जगात आघाडीवर आहे. नवीन अधिसूचनेनुसार ज्याप्रमाणे टीव्ही, थिएटरच्या पडद्यावर आपण तंबाखूविरोधी इशाऱ्याचा संदेश पाहतो तसा आता OTT प्लॅटफॉर्मवर संदेश देणे अनिवार्य आहे. ३१ मे रोजीच्या ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’च्या निमित्ताने ही अधिसूचना जारी केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, “ऑनलाइन क्युरेटेड कंटेंटच्या पब्लिशरने उप-नियमांच्या तरतुदींचे केले नाही तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली आंतर-मंत्रिमंडळ समिती स्वेच्छा अथवा तक्रारीची दखल घेत कारवाई करेल आणि ऑनलाइन क्युरेटेड कंटेंटच्या पब्लिशरची ओळख पटल्यानंतर त्याच्याकडून स्पष्टीकरण मागेल आणि कंटेंटमध्ये बदल करण्यासाठी नोटीस जारी करेल.”

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांबाबतची नवीन मार्गदर्शक तत्त्वे अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत लागू होतील, असे अधिसूचनांमध्ये नमूद केले आहे.

तंबाखूच्या व्यसनाने जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी सुमारे १३ लाख मृत्यू तंबाखू आणि धुम्रपान सेवनामुळे होतात. तर जगभरातील मृत्यूचे प्रमाणे ८० लाख एवढे आहे. भारत हा तंबाखूचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे.

यंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची (Anti-Tobacco Day 2023) थीम ‘आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज आहे’ अशी आहे. २०२३ च्या जागतिक तंबाखूविरोधी मोहिमेचे उद्दिष्ट तंबाखू उत्पादक शेतकर्‍यांसाठी पर्यायी पीक उत्पादन आणि विपणनाच्या संधींबद्दल जागरुकता वाढवणे आणि त्यांना शाश्वत पिके घेण्यास प्रोत्साहित करणे हे आहे. (anti-tobacco warnings on OTT platforms)

 हे ही वाचा :

Back to top button