आप नेते सत्येंद्र जैन यांना ६ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर | पुढारी

आप नेते सत्येंद्र जैन यांना ६ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर

पुढारी ऑनलाइन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने आप नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव अटींसह सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. परवानगीशिवाय ते दिल्ली सोडू शकत नाहीत आणि मीडियासमोर कोणतेही वक्तव्य करू शकत नाहीत.

सत्येंद्र जैन हे मागील काही काळापासून हवाला प्रकरणी तिहार कारागृहात होते. गेल्या बुधवारी तुरुंगातील बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. त्यानंतर त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच त्यांनी पाठ, खांदा आणि सतत दुखत असल्याची तक्रार जैन यांनी तिहार तुरुंग प्रशासनाकडे अलीकडेच केली होती. यानंतर त्यांना आधी दीनदयाळ रुग्णालयात तर नंतर लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तिहार तुरुंगात चक्कर येऊन ते पडले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान ‘देशाचा हुकूमशहा चांगल्या माणसाला मारण्याचा कसोशीचा प्रयत्न करीत आहे’ अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जैन यांच्या प्रकृतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. बिकट संकटाचा सामना करण्यासाठी देव त्यांना ताकत देवो, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

AAP leader Satyendra Jain : ‘आप’चे माजी मंत्री सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल

आप नेते सत्येंद्र जैन ऑक्सिजन सपोर्टवर

Back to top button