

पुढारी ऑनलाईन डेस्क : आप नेते सत्येंद्र जैन यांनी तब्येत बिघडल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. याबबत एएनआय वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार अधिक तपशील अजुन मिळालेला नाही. (बातमी अपडेट होत आहे) (AAP leader Satyendra Jain )
मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले आप नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे (दि.१५ मे). दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या आदेशाला त्यांनी आता आव्हान दिले आहे.
हवाला प्रकरणात गंभीर आरोप झालेले सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने मे 2022 मध्ये अटक केली होती. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या मनीष शिसोदिया यांच्यासोबत जैन यांचे मंत्रिपदही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काढून घेतले होते. जैन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. ती याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. जामीन अर्ज फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला त्यांनी आता आव्हान दिले आहे.
हेही वाचा