

पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या तीव्र लाटांनी बेजार केले होते. मात्र सध्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाणात काही प्रमाणात वाढले आहे. कडक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने भारताच्या वायव्येकडील काही राज्यांना आजपासून (दि.२४) मुसळधार पावसाचा (Rainfall Forecast) इशारा दिला आहे.
भारताताच्या उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बलुचिस्तान, मुझफ्फरबाद, उत्तराखंड, पंजाब आणि दक्षिण हरियाणा या राज्यांना भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट (Rainfall Forecast) देण्यात आला आहे. दरम्यान २६ मे पर्यंत या राज्यांत मुसळधार पाऊस तर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणात गारपीट होण्याची शक्यता देखील IMD ने दिलेल्या माहितीत वर्तवली आहे.
सोमवारी (दि.२२) दिल्लीतील काही भागात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले. याठीकाणी सर्वोच्च ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र सध्याच्या हवामान स्थितीवरून उष्णतेच्या लाटेपासून दिलासा (Rainfall Forecast) मिळू शकणार आहे.