झारखंडमधील कुख्यात नक्षली कमांडर ‘एनआयए’च्या ताब्यात | पुढारी

झारखंडमधील कुख्यात नक्षली कमांडर 'एनआयए'च्या ताब्यात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : झारखंडमधील पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफएलआय) स्वयंघोषित कमांडर दिनेश गोपे याला राष्ट्रीय तपास संस्थेकडून ( एनआयए) आज ( दि. १९) अटक करण्यात आली. ‘पीएफएलआय’ ही माओवाद्यांची प्रामुख्याने झारखंडमध्ये कार्यरत असलेली संघटना आहे. गोपे हा कुलदीप यादव आणि बाडकू या नावानेही ओळखला जातो. ( Wanted Naxal Leader )

तीस लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या दिनेश गोपेविरोधात शंभरपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गोपे हा झारखंडमधील खुंटी जिल्ह्याचा रहिवासी आहे. 2018 साली माओवाद्यांकडून 25 लाख रुपये सापडल्याच्या प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मागील दोन दशकांपासून तो फरारी होता.

हेही वाचा : 

 

Back to top button