karnataka cm name | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची आज अधिकृत घोषणा, २० मे रोजी शपथविधी? | पुढारी

karnataka cm name | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची आज अधिकृत घोषणा, २० मे रोजी शपथविधी?

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण? यासाठी काँग्रेसमध्ये गेली तीन दिवस मॅरेथॉन बैठक झाल्या आणि चौथ्या दिवशी यावरुन सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun kharge) आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करणार आहेत. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (KPCC) प्रमुख डी. के. शिवकुमार (dk shivakumar) हे मुख्यमंत्रीपदाचे दोन प्रमुख दावेदार आहेत. पण मुख्यमंत्रीपदी सिद्धारामय्या (siddaramaiah) यांचे नाव (next cm of karnataka) जवळपास निश्चित मानले जात आहे. तर शिवकुमार यांनी महत्त्वांच्या खात्यासह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. (karnataka cm name)

दरम्यान, आज संध्याकाळी बंगळूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तर नवीन सरकारचा शपथविधी २० मे रोजी बंगळूर येथे होणार असल्याचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन सस्पेन्स सुरू असतानाच गुरुवारी संध्याकाळी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची (CLP) बैठक डी. के. शिवकुमार यांनी बोलावली आहे. त्यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून नवनिर्वाचित आमदार, विधानपरिषद आमदार आणि खासदारांना संध्याकाळी ७ वाजता येथील क्वीन्स रोडवरील इंदिरा गांधी भवनात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आज तोडगा निघण्याची शक्यता

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणार्‍या काँग्रेसला अद्यापही मुख्यमंत्रिपदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करता आलेले नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्याच नावांची चर्चा आहे. शिवकुमार यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेला तडजोडीचा प्रस्ताव फेटाळला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची, यावर गेल्या चार दिवसांपासून मंथन करीत आहेत. त्यामुळे पेच कायम आहे. तोडगा गुरुवारी निघण्याची शक्यता आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत, निर्णय लवकरच कळवला जाईल, असे बुधवारी स्पष्ट केले. मंत्रिमंडळासंबंधी ४८ ते ७२ तासांमध्ये निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, दुसरीकडे बंगळूरच्या कंठिरवा स्टेडियममध्ये शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ७५ वर्षीय सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावाला सर्वाधिक आमदारांनी पसंती दर्शवली आहे. पक्षश्रेष्ठींकडून त्यामुळे डी. के. शिवकुमार यांना विश्वासात घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाईल. दरम्यान, शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांना कुठले मंत्रालय देण्यात येईल, यासंबंधीदेखील चर्चा सुरू आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपदांना शिवकुमार यांचा विरोध असल्याचे कळते. परंतु, राज्यात वोक्कलिग, लिंगायत आणि दलित समाजातील प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री बनवण्यासंबंधी पक्षश्रेष्ठी विचारमंथन करीत आहेत.
सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबत जवळपास एक तास चर्चा केल्यानंतरदेखील शिवकुमार यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले नसल्याचे कळते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री बनवले, तर कुठलाही आक्षेप नसल्याचे शिवकुमार यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधी यांच्याशी चर्चा

सिद्धरामय्या यांनी काल सकाळी सव्वाअकराच्या सुमारास राहुल गांधी यांची ‘१० जनपथ’ येथे भेट घेतली. जवळपास एक तास या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. यावेळी काही आमदारदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर डी. के. शिवकुमार यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राहुल यांची भेट घेतली. त्याआधी पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. दरम्यान, तोडग्याचे सारे प्रस्ताव शिवकुमार यांनी फेटाळले असून, ते मुख्यमंत्रिपद मलाच मिळावे म्हणून ठाम आहेत. हे पद न मिळाल्यास मी आमदार म्हणून पक्षाची व जनतेची सेवा करेन, असेही त्यांनी म्हटले आहे. (karnataka cm name)

हे ही वाचा :

Back to top button