IPL Playoff Scenario : मुंबई इंडियन्सचा पराभव होताच बदलेले प्लेऑफचे समीकरण

IPL Playoff Scenario : मुंबई इंडियन्सचा पराभव होताच बदलेले प्लेऑफचे समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Playoff Scenario : लखनौ सुपर जायंट्सकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात एलएसजीने एमआयवर अवघ्या 5 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, या पराभवामुळे थेट प्लेऑफमध्ये एन्ट्री घेण्यात मुंबई संघापुढे अडथळे निर्माण झाले आहेत. आता त्यांना रोहितच्या संघाला शेवटचा सामना मोठ्या फरकानेच जिंकावा लागणार आहे. पण त्याचबरोबर इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. येथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की या परिस्थितीत हार्दिक पंड्याच्या गुजरात संघाची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

दुसरीकडे, लखनौ संघाने विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. यासह प्लेऑफची शर्यत चुरशी बनली आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे आता प्रत्येकी 15 गुण झाले आहेत. मुंबई इंडियन्सचा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. रोहितच्या संघाने हा सामना जिंकला तरी ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाहीत कारण त्यांचा नेट रनरेट खूपच खराब असून तो निगेटीव्ह आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर किंवा पंजाब किंग्जने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होईल. त्यामुळे मुंबईला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. (IPL Playoff Scenario)

एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला पुन्हा एकदा टॉप-2 मध्ये जाण्याची संधी आहे. येत्या शनिवारी (दि. 20) सीएसकेचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना आहे. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवल्यास ते पहिल्या स्थानी पोहचतील. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा लखनौचा संघ केकेआरला मोठ्या फरकाने पराभूत करणार नाही. (IPL Playoff Scenario)

राजस्थान-कोलकात्याचे नशीब उघडे (IPL Playoff Scenario)

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला प्रत्येकी 14 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. जर त्यांनी शेवटचा सामना जिंकला आणि 14 गुण मिळवले तर ते मुंबई इंडियन्सला नेट रनरेटमध्ये मागे टाकून पुढे जाऊ शकतात. मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने पराभव केल्यास आरआर आणि केकेआर या दोन्ही संघांचा मार्ग सोप्पा होईल.

आरसीबी-पंजाबच्या हातात नशीब (IPL Playoff Scenario)

आरसीबी आणि पंजाब किंग्जचा नेट रनरेट चांगला आहे. दोन्ही संघांनाही शेवट्च्या सामन्यांत त्यांचा खेळ उचवावा लागेल. जर आरसीबी आणि पंजाबने त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करतील. मग मुंबईने हैदराबादवर मात केली तरी काही फरक पडणार नाही. लखनौ आणि चेन्नईने आपला शेवटचा सामना गमावला तर आरसीबी आणि पंजाबला टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याची मोठी संधी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news