दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत हादरे, अनेक प्रवासी जखमी | पुढारी

दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत हादरे, अनेक प्रवासी जखमी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीहून सिडनीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हादरे बसले. या धक्क्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त येत आहे. जखमी प्रवाशांवर सिडनी विमानतळावर उपचार करण्यात आले आहेत. एअर इंडियाच्‍या विमानात तांत्रीक बिघाड झाला. त्‍यामुळे विमानाला हवेत हादरे बसले. यामुळे काही प्रवासी जखमी झाले, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली.

सिडनी विमानतळावर उपचार

जखमी यात्रेकरुंवर सिडनी विमानतळावर उपचार करुन सोडण्यात आले. कोणत्याही प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे लागले नाही, अशी माहिती हवाई वाहतूक महासंचलनालयाकडून (डीजीसीए) देण्यात आली आहे. एअर इंडियाच्या बी ७८७-८०० हे विमानाच्या बाबतीत हा प्रकार घडला. सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. केबिन क्रूने जखमींवर प्राथमिक उपचार केले.

विमानात डॉक्टर आणि नर्स होते

डीजीसीएने सांगितले की, केबिन क्रूच्या प्रवाशांमध्ये एक डॉक्टर आणि एक नर्स देखील होती. त्याच्या मदतीने जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. सिडनीतील एअर इंडियाच्या विमानतळ व्यवस्थापकाने वैद्यकीय मदत पुरविल्याची माहितीही डीजीसीएने दिली. काही प्रवाशांनी वैद्यकीय मदत घेतली. रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती.

हेही वाचा : 

Back to top button