Karnataka CM Decision | सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, डी. के. शिवकुमारांना उपमुख्यमंत्रीपद? उद्या शपथविधीची शक्यता

Karnataka CM Decision | सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, डी. के. शिवकुमारांना उपमुख्यमंत्रीपद? उद्या शपथविधीची शक्यता

पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नाव निश्चित झाले आहे. त्यांचा शपथविधी उद्या गुरुवारी होण्याची शक्यता आहे. ते उद्या एकटेच शपथ घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त India Today ने दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाचे आणखी एक दावेदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना नवीन सरकारमध्ये महत्त्वपूर्ण कॅबिनेट खात्यांसह उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. उद्या दुपारच्या जेवणानंतर शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत सिद्धरामय्या आज मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच, उद्या गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कांतीरवा स्टेडियमवर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. (Karnataka CM Decision)

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत सिद्धरामय्या आज मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही स्वतंत्रपणे मल्लिकार्जुन खर्गे (congress chief Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे समजते. गुरुवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीपूर्वी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खंदारे आणि पक्षाचे इतर आमदार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. या ठिकाणी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत.

कर्नाटकात काँग्रेसने १३५ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. पण मुख्यमंत्रीपदावरून सिद्धारामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात रस्सीखेच झाली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांना कर्नाटकातील दिग्गज जननेते मानले जाते. तर शिवकुमार हे त्यांच्या मजबूत संघटनात्मक क्षमतेसाठी ओळखले जातात आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांना कठीण काळात काँग्रेसचे संकटमोचक मानले जाते. (Karnataka CM Decision)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्‍ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर मुख्‍यमंत्रीपदाची धुरा कोणाचा हाती येणार याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागले आहे. यावरून काँग्रेसमध्‍ये खलबते सुरू झाली. माजी मुख्‍यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्‍यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्‍सीखेच सुरू होती.

सोमवारी बंगळूरहून आलेल्या पक्ष निरीक्षकांचा अहवाल खर्गे यांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी राहुल गांधी हे खर्गे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी सुमारे दीड तास कर्नाटकातील स्थितीवर चर्चा केली. आजही चर्चेच्या फैऱ्या सुरु आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news